मुलाच्या प्रसंगावधानाने आग वेळीच अाटोक्यात

कोंढवा - फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत जळलेल्या वस्तू.
कोंढवा - फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत जळलेल्या वस्तू.

कोंढवा - कोंढवा-कात्रज रस्त्यावरील बौद्धविहार अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये आगीची घटना घडली; मात्र घरात असलेल्या मुलाच्या प्रसंगावधानाने व अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्‍यात आणल्याने 
धोका टळला.

बौद्धविहार अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटला गुरुवारी (ता. १२) सकाळी आग लागली. फ्लॅटमधील ऋषिकेश मोरे (वय १५) याने सतर्कता दाखवत अग्निशामक दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. यात तिथेच राहत असलेले जवान गणपत पडये यांची मदत मोलाची ठरली. कोंढवा बुद्रुक येथील अग्निशामक वाहन व देवदूत क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी दाखल झाली. फ्लॅटमधील दूरचित्रवाणी संच, कपाट, वायरिंग व इतर घरगुती वापराच्या साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी ताबडतोब पाण्याचा मारा करत दहा मिनिटांत आग पूर्णतः आटोक्‍यात आणली. याबाबत ऋषिकेश म्हणाला, की मी झोपलो असताना अचानक काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने मला जाग आली. मी तातडीने अग्निशामक दलास माहिती कळविली व जवानांनी चोख कामगिरी बजावली. या कामगिरीमध्ये कोंढवा अग्निशामक केंद्राचे तांडेल सुभाष जाधव, गणपत पडये, चालक सुखदेव गोगावले, जवान संग्राम देशमुख, विशाल यादव आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टीमचे अंबादास घनवट, प्रदीप कोकरे, अविनाश लांडे सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com