पुणे - वडगाव शेरी येथे महाउर्जाच्या कार्यालयाला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

वडगाव शेरी (पुणे) : राज्याचा महत्वाचा विभाग असलेला महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण (महाउर्जा) कार्यालयाला आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे आणि संगणक प्रणाली जळाल्याची माहिती मिळाली आहे. 

महाऊर्जाचे राज्याचे प्रमुख कार्यालय येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे आहे. त्याच्या सह्याद्री रूग्णालयाजवळील पहिल्या मजल्यावरील उर्जा बचत विभागाला आग लागल्याचे लक्षात आल्यावर अग्निशामक दलाला कळवण्यात आले. कागद पत्रांच्या फाईली, संगणक प्रणाली यांनी लागलीच पेट घेतला. छताचे पीओपीही गळून पडले. त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या कार्यालयात राज्यातील विविध प्रकल्पांची महत्वाची कागदपत्रे होती अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. 

ही आग कशामुळे लागली, आग लागली त्यावेळी कर्मचारी कोठे होते, आग प्रतिबंधक यंत्रणा होती का, आगीत नेमकी कोणत्या प्रकल्पाची कागदपत्रे व कोणत्या फाईली जळाल्या, इतर दोन विभागातील फाईलीही पाण्यात भिजल्याने नेकमे नुकसान किती, हे प्रश्न त्यामुळे निर्माण झाले आहेत. येरवडा अग्निशामन दलाने पावने तीन वाजल्यापासून साडे चार वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस व अधिकाऱ्यांकडून आगीतील नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू होते. 

Web Title: fire at mahaurja wadgao sheri pune