थेऊर येथील 'राइस अॅन्ड शाइन बायोटेक' कंपनीला भीषण आग

fire
fire

लोणी काळभोर (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील राइज अॅन्ड शाइन बायोटेक प्रायव्हेट लिमिटीड या उत्तीसंर्वधन पद्धतीने रोपे तयार करणाऱ्या कंपनीच्या प्रयोगशाळेच्या इमारतीला शुक्रवारी (ता. 14) सकाळी साडेनऊ वाजण्याचे सुमारास भीषण आग लागली. कामाच्या एका शिफ्टमध्ये दोनशेहुन अधिक कामगार काम करत असलेल्या प्रयोगशाळेला लागलेल्या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी पंधरा कोटीहुन अधिक रकमेची वित्तहानी झाली आहे. 

आग विझवण्यासाठी 7 ते 8 अग्निशमन दलाचे बंबांना पाचारण करुनही, आग नियंत्रणात येण्यास आठ तासाहुन अधिक काळ लागले. आगीचे नेमके कारण समजु शकले नाही. दरम्यान राइज अॅन्ड शाइन बायोटेक प्रायव्हेट लिमिटीड कंपनीच्या प्रयोगशाळेचे मुख्य व्यवस्थापक उमाकांत शिवराम होवाळ (वय- 51, रा. मांजरी ग्रीन, मांजरी भुद्रुक ता. हवेली) यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.

पुणे-सोलापुर महामार्ग ते लोणी कंद या मार्गावर थेऊर येथे शिक्षणसम्राट पी. डी. पाटील यांच्या कुटुबांच्या मालकीच्या फार्म हाऊसच्या आवारात राइस एन शाइन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातुन केळी फळासह लिली, ऑरकिड व जरबेरा फुलांच्या रोपाची निर्मीती केली जाते. कंपनीच्या माध्यमातुन केळी फळासह लिली, ऑरकिड व जरबेराची रोपे महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशात व देशाबाहेरही रोपांची विक्री केली जाते. या प्रयोगशाळेत तिन शिफ्टमध्ये मिळुन सातशेहुन अधिक कामगार काम करतात.

प्रयोग शाळेतील कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेमधील क्रमाक दोनच्या पीजीआर जवळ एका कामगाराला सकाळी नऊ वाजनेच्या सुमारास वास आल्याने, त्याने ही बाब प्रयोगशाळेत उपस्थित असणाऱ्या वरीष्ठाला दिली. वरीष्ठ अधिकाऱ्याने वास येणाऱ्या ठिकाणाजवळ जाऊन पाहिले् असता, संबधित ठिकाणी छोट्या प्रमानात आग लागल्याचे दिसुन आले. यावर संबधित अधिकाऱ्याने ही बाब उमाकांत होवाळ यांना कऴवली. व प्रयोगशाळेतील अग्नीशमन यंत्राने आग विजवण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र आगीने दहा मिनीटाच्या आतच उग्र रुप धारण केल्याने, प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. दरम्यान ही बाब लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र आग मोठ्या प्रमानात पसरल्याने आठ बंबाच्या माध्यमातुन पा3ण्याचा मारा करुनही, आग आटोक्यात येण्यास आठ तासाहुन अधिक काळ लागले.

प्रयोगशाळेत काम करणाऱ्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार, आगीमुळे प्रयोगशाळेचे सुमारे पंधरा कोटीहुन अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. तीन कोटीहुन अधिक किमतींची वातानुकीत यंत्रना, पाच कोटीहुन अघिक करमेची पॅनेल व प्रयोग शाळेतील विविध यंत्रे आगीत नष्ठ झाली आहेत. आग धमसत असल्याने, नकसानीची पहाणी पूर्ण झाली नसली तरी नुकसानीचा आकडा आनखी वाढुही शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com