रिपाई जिल्हाध्यक्षाच्या मुलावर भरदिवसा गोळीबार; प्रकृती चिंताजनक

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

दौंड शहरात आज दुपारी रोहित रवींद्र कांबळे या तरूणावर गोळीबार करण्यात झाला आहे. 

दौंड (पुणे) : दौंड शहरात आज दुपारी रोहित रवींद्र कांबळे या तरूणावर गोळीबार करण्यात झाला आहे. 

दौंड शहरात आज (ता. २२) दुपारी चार वाजता दौंड- लिंगाळी रस्त्यावर वॅसकाॅन सोसायटी वळणावर हा गोळीबार झाला. रोहित हा दुचाकीवर असताना अनोळखी हल्लेखोराने रोहित याच्या मांडीवर व पाठीवर गोळ्या झाडल्या.

रोहित कांबळे याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. रोहित कांबळे हा रिपाईंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे यांचा मुलगा आहे. सदर गोळीबार हा पैशांच्या व्यवहारातून झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire on rohit kamble in daund city pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: