पुणे : लालमहालाजवळील दुकानांना आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

लालमहालाजवळील जिजामाता चौकानजीक असलेल्या एका सायकलच्या गोडाऊनसह अन्य दुकानांना सोमवारी (ता. 15) पहाटे साडेपाच वाजता आग लागली.

पुणे : लालमहालाजवळील जिजामाता चौकानजीक असलेल्या एका सायकलच्या गोडाऊनसह अन्य दुकानांना सोमवारी (ता. 15) पहाटे साडेपाच वाजता आग लागली. आग मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.  

लाल महालाशेजारील एका मोठ्या इमारतीमधील सायकलच्या गोडाऊनला पहाटे आग लागली. त्यानंतर हळूहळू आग गोडाऊन शेजारील अन्य दुकानानांही आग लागली. दरम्यान धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागल्याने रहिवाशांनी अग्निशामक दलास खबर दिली. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अर्ध्या तासात आग विझविली. दरम्यान आगीमुळे रहिवासी सोसायटीच्या टेरेसवर जाऊन थांबले होते. त्यांना जवानांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढले.

Web Title: Fire at shops near Lalmahal Pune