जुन्नर - ऊसतोडणी कामगारांच्या सात कोप्यांना आग

दत्ता म्हसकर
बुधवार, 28 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : धालेवाडी तर्फे हवेली ता.जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणीचे काम करणाऱ्या सहा कामगारांच्या कोप्यांना मंगळवारी (ता.27) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. या आगीत सहा कुटुंबांचे सर्व साहित्य जळून खाक झाले त्यामध्ये एक मोटार सायकल, दागीने,पैसे धान्य व दैनंदिन वापरातील सर्व वस्तूंचा सामावेश असून तीन शेळ्या, तीन कोकरांचा तसेच एक म्हैस होरपळून मृत्यू झाला असल्याचे धालेवाडीतर्फे हवेलीचे गाव कामगार तलाठी भोसले यांनी सांगितले.

या दुर्घटनेत जळीत झालेल्या ऊसतोडणी कामगारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यात  बाबासाहेब हाके 2 लाख 59 हजार 100, गणेश हाके 94 हजार 600,
बापू हाके 1 लाख 32 हजार 300, विष्णू ढवळे 36 हजार 500, सोमनाथ ढवळे 15 हजार100, संजय रूपनर 1 लाख 26 हजार असे एकूण सात लाखाचे  नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या दुर्घटनेची माहीती समजताच श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले, शेतकी अधिकारी गोरक्ष उकिर्डे यांनी तातडीने मदतीसाठीची यंत्रणा घटनास्थळी पाठविल्याने पुढील अनर्थ टळला.

Web Title: fire at sugarcane employees home at junnar