जांभूळवाडीत तीन गोडाऊन खाक 

जांभूळवाडीत तीन गोडाऊन खाक 

कात्रज - जांभूळवाडी परिसरातील दरीपुलाखाली आग लागून तीन गोडाऊन खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात फर्निचर साहित्यासह प्लॅस्टिक बाटल्यांचे नुकसान झाले. गोडाऊनमध्ये असलेल्या गॅससिलिंडरचाही स्फोट झाला. कात्रज आणि सिंहगड अग्निशमन केंद्राच्या जवानांनी दोन तासांत ही आग आटोक्‍यात आणली. 

जांभूळवाडी दरीपुलाखाली तीन गुंठे जागेत चार पत्राची गोडाऊन उभारण्यात आली आहेत. दोन गोडाऊनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचे प्रेस केलेले गठ्ठे साठवले जात होते. उर्वरित दोन गोडाऊनमध्ये फर्निचर साहित्य ठेवले होते. रात्री दहाच्या सुमारास या बंद गोडावूनला अचानक आग लागली. याबाबत रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. कात्रज अग्निशमन केंद्राचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीत दोन गॅससिलिंडरचा स्फोट झाला. सिंहगड अग्निशमन केंद्राचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर दोन तासांत ही आगा आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. गोडाऊनशेजारी ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या गठ्ठ्यांना प्रथम आग लागून ती आग गोडाऊनपर्यंत पोचल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

पश्‍चिम बाह्यवळण मार्गावर जांभूळवाडी दरीपुलाच्या संरक्षित जागेत उभारलेली बेकायदा गोडाऊन पुलाला धोका निर्माण करीत आहेत. गोडाऊनला आग लागून पुलाखालीच सिलिंडरचे स्फोट झाल्यानंतर तरी आता पीएमआरडीए प्रशासन याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com