पारवडीत वनव्यात जळालेल्या झाडांना नवपालवी  

संतोष आटोळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

एस. एस. फरांदे ( वन परिक्षेत्र अधिकारी बारामती)
पारवडीमध्ये वन क्षेत्रात अज्ञाताने आग लावल्याने मोठी दुर्दैवी घटना घडून मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र जळाले होते. याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा नोदवण्यात आला होता.सदर झाडे जगवण्याबाबत वनविभागाच्या सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले.यामुळे प्रयत्नांचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत.आगामी काळामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर वनाचे वनव्यांपासुन संरक्षण तसेच प्राण्यांसाठी पाणी याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.   

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील पारवडी गावानजीकच्या वनविभागाच्या जंगलास डिसेंबर महिन्यामध्ये लागलेल्या वनव्यामध्ये जळालेल्या हजारो झाडांना सध्या नवपालवी फुटली आहे. यामुळे वन विभागाच्या झळालेली झाडे जगवण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. तसेच वनातील प्राण्यांनाही आधार मिळणार आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि तालुक्यातील पारवडी, शिर्सुफळ, गाडीखेल, साबळेवाडी या भागात शासनाच्या वन विभागाच्या आधिपत्याखाली हजारो एकर क्षेत्र आहे.यामध्ये शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण, नालाबांध, मातीनाला, समतल चर या सारख्या योजना राबवल्या जातात.तसेच वृक्षारोपण करुन त्यांच्या संगोपनासाठी लाखो रुपयांच्या निधीची तरतूद असते.

यामध्ये पारवडी येथील वन विभागामध्येही गेल्या तीन वर्षांपासुन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.तसेच मागील वर्षीच्या समाधानकारक पावसाने सर्वत्र हिरवाई पसरली होती. डिसेंबरमध्ये या भागातील गवत सुकून वाळले होते. याचा कालखंडात समाजघातक वृत्ती असलेल्या अज्ञात व्यक्तीने वन क्षेत्राला आग लावली यामुळे या आगीत दर्जेदार वृक्ष व नवीन लागवडीतील फुललेली झाडी संपूर्णत: नष्ट झाली.

या पार्श्वभूमीवर सदर जळालेली झाडे जगवण्याचे आव्हान वन विभागापुढे होते. यास वन विभागाला यश आले आहे.सध्या जळालेल्या झाडांना नवपालवी फुटायला सुरवात झाली आहे.यामुळे जळुन काळसर झालेल्या वनक्षेत्राचे रुप बदलत आहे.याचा वनक्षेत्रातील ससे, घोरपडी, हरणे या सारख्या प्राण्यांना फायदा होणार आहे. अशी माहिती बारामतीचे वनपरिमंडल अधिकारी त्रिंबक जराड यांनी दिली. तसेच याबाबत वन्यप्रेमींमधुन समाधान व्यक्त होत आहे.

एस. एस. फरांदे ( वन परिक्षेत्र अधिकारी बारामती)
पारवडीमध्ये वन क्षेत्रात अज्ञाताने आग लावल्याने मोठी दुर्दैवी घटना घडून मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र जळाले होते. याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा नोदवण्यात आला होता.सदर झाडे जगवण्याबाबत वनविभागाच्या सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले.यामुळे प्रयत्नांचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत.आगामी काळामध्ये उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर वनाचे वनव्यांपासुन संरक्षण तसेच प्राण्यांसाठी पाणी याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे.   

Web Title: fire on tree parwadi