शिवणे येथे ट्रकला आग लागली

fire.jpg
fire.jpg

शिवणे : दांगट पाटीलनगर येथील ट्रकला मंगळवारी रात्री पाऊणे अकरा वाजता आग लागली होती. यावेळी ट्रकमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

अज्ञात व्यक्तीने येथे कचरा जाळला होता. ती आग येथे उभ्या असलेल्या ट्रकला लागली. ट्रकचा इंजिनचा भाग व केबिनमधील सिटच्या स्पंजमुळे आग भडकली होती. यावेळी परिसरातील कंपन्या बंद होत्या. 

दरम्यान, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नांदेड येथील अग्निशमन दल घटनास्थळी पोचले. फायरमन महेश गटमाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने आग विझवली ट्रकचा इंजिनचा भागातच आग लागली होती. गाडीच्या एका ही टायरला आगीची झळ बसली नाही. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com