पुण्यात पुन्हा वाहनांची जाऴपोळ; चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे : सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाकडुन वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्याचे सत्र थांबण्यास तयार नाही. बुधवारी रात्री उशिरा कसबा पेठ व खडकी येथे गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला. 

पुणे : सराईत गुन्हेगार व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाकडुन वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्याचे सत्र थांबण्यास तयार नाही. बुधवारी रात्री उशिरा कसबा पेठ व खडकी येथे गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला. 

वारजे माळवाडी, बोपोडी, हडपसर येथील गाड्या जाळपोळ व तोडफोडच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी पुन्हा एकदा सर्वसामान्य पुणेकरांच्या गाड्यावर संकट आले. गुन्हेगारांमधील आपापसातील भांडणातुन कसबा पेठेत बुधवारी रात्री पुन्हा 4 गाड्या जाळण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. याबरोबरच खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही गाड्या जाळण्याचा प्रकार उघडकीस आला. 

जानेवारी ते नोव्हेंबर 2018 पर्यंंत शहरात गाड्याची जाळपोळ, तोडफोडीच्या 33 घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पोलिसांनी 77 जणांना अटक केली. या घटनामध्ये तब्बल दिड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे असतानाही गुन्हेगारावर पोलिसांचा वचक नसल्यामुळे या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याची सद्यस्थिती आहे.

Web Title: Fires of vehicles again in Pune; Four arrested