लहानग्यांसाठी "पोगो', "डोरेमोन'चे फटाके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

पुणे - दिवाळी आणि फटाके हे नातं अतूटच... विशेषत: लहान मुलांचा आवडीचा विषय. लहानग्यांना आकर्षित करण्यासाठी उत्पादकांनी "निंजा चक्कर', "टग ऑफ वॉर', "पोगो', डोरेमोन अशी कार्टूनची नावे फटाक्‍यांना दिली आहेत. दरम्यान,
सर्वोच्च न्यायालयाने फटाक्‍यांचा आवाज आणि प्रदूषणासंदर्भात निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता आवाजापेक्षा शोभिवंत आणि हवेत उडविण्यात येणाऱ्या फटाक्‍यांना मागणी वाढली आहे.

फटाक्‍यांविषयी अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे, त्यामुळे मोठा आवाज असलेल्या फटाक्‍यांची मागणी पूर्वीच्या तुलनेत कमी होत आहे. पण त्याचवेळी शोभिवंत आणि हवेत उडविण्याचे फटाके दिवाळीत रंगत आणत आहेत. त्यामुळेच या फटाक्‍यांना मागणी वाढत आहे. त्यामुळे उत्पादकांनीही ग्राहकांची आवड लक्षात घेत या फटाक्‍यांमध्ये विविधता आणली आहे. भुईचक्र, भुईनळे, फुलबाजे, आकाशात उंच जाऊन रंगीबेरंगी कारंजी सोडणारे "फॅन्सी फटाके' अशा विनाआवाजाच्या फटाक्‍यांचे असंख्य प्रकार आले आहेत. लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून विविध फटाके आणले आहेत. त्यांची नावे "निंजा चक्कर', "टग ऑफ वॉर', "पोगो', डोरेमोन अशी दिली आहेत. ते घेण्यासाठी लहानगे दुकानांमध्ये गर्दी करीत आहेत.

एकीकडे शहराच्या मध्यभागात आवाजाच्या फटाक्‍यांना कमी प्रतिसाद असला तरी उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांकडून आवाज असलेल्या फटाक्‍यांना मागणी असते, असे व्यापारी संतोष बोरा यांनी नमूद केले.

प्रदूषण निर्माण करणाऱ्या चायनीज फटाक्‍यांना आपल्याकडे बंदी आहे. आपल्या देशात विशेषत: शिवकाची येथे तयार केल्या जाणाऱ्या फटाक्‍यांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल हा प्रदूषण विभागाच्या परवानगीनेच वापरला जातो. उत्पादकही पर्यावरण संतुलन, आवाज कमी आणि सुरक्षितता याचा विचार करून उत्पादन बाजारात आणत असल्याचे गेल्या पाच वर्षांत दिसत आहे. त्यातूनच या वर्षी " फ्लिकरिंग' (तडतडी) हा नवीन प्रकार बाजारात आला आहे.
 - संतोष बोरा, फटका व्यापारी

Web Title: Firework named as Pogo, Doremon