पुणे : कोथरुडमध्ये भरदिवसा गोळीबार करीत सराफी दुकान लुटले

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

पुणे : कोथरुड परिसरातील एका सराफी दुकानामध्ये चोरट्यांनी भर दिवसा गोळीबार करीत दरोडा घातला. चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांचे सोने चोरुन नेले आहे. या गोळीबारामध्ये कोणीही जखमी नाही. ही घटना पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. 

पुण्यात मेडिकल शॉपमध्ये आढळली चक्क घोरपड!

कोथरुडमधील आनंदनगर येथे मुख्य चौकातील एका सराफी दुकानामध्ये पावणे पाच वाजता दोघेजण घुसले. त्यांनी दुकानाचे मालक व कर्मचाऱ्यांना पिस्तूल दाखवून दुकानामधील सोन्या-चांदीचे दागिने लुटण्यास सुरूवात केली. त्यावेळी दुकानामधील कर्मचाऱ्यांनी चोरट्यांना विरोध दर्शविला. तेव्हा पिस्तुल बाळगलेल्या चोरट्याने हवेत दोनदा गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रतिकार कमी झाला. त्यानंतर चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने घेऊन ते चांदणी चौकाच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात घबराट पसरली.

भोसरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरून खून 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing and Robbery at jewelry shop In Kothrud

टॉपिकस