
विशाल प्रल्हाद पंजाबी (वय ३६) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. दत्तनगर परिसरात पंजाबी यांचे बालाजी ट्रेडिंग नावाचे किराणा दुकान आहे.
पुणे : आंबेगाव बुद्रुक परिसरातील दत्तनगर येथे एका व्यावसायिकावर अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना रविवारी (ता.१४) रात्री नऊच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
- पुणेकरांसाठी मोठी बातमी; नगर हायवेवरील वाहतूक कोंडी फोडणार 'नागपूर पॅटर्न'!
विशाल प्रल्हाद पंजाबी (वय ३६) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. दत्तनगर परिसरात पंजाबी यांचे बालाजी ट्रेडिंग नावाचे किराणा दुकान आहे. या ठिकाणी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून ते पसार झाले. यामध्ये पंजाबी हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)