नगरसेवकावरील गोळीबार; आरोपींवर मोक्का 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पिंपरी : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या नगरसेवकावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. 

साबीर समीर शेख (वय 19, रा. गांधीनगर, देहूरोड), जॉनी ऊर्फ साईतेजा शिवा चिंतामल्ला (वय 19, रा. ऑर्डनन्स फॅक्‍टरी कॉलनी, देहूरोड), आफताब समीर शेख (रा. जामा मस्जिदच्या मागे, देहूरोड) अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

नगरसेवक विशाल खंडेलवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी देहूरोड येथे गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी साबीर व जॉनीला अटक केली असून, आफताब फरारी आहे. 
दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी या आरोपींवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंजुरी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firing on corporator at dehu contonment board