गोळ्या झाडणारे बाप-लेक ‘सुपारी किलर’

Firing
Firing

पुणे - चंदननगरमधील महिलेची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडणारे आरोपी बाप-लेक आहेत. दोघेही ‘सुपारी किलर’ असून, त्यांनी अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून संबंधित महिलेचा खून केला असल्याची माहिती पुढे आली असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. 

शिवलाल ऊर्फ शिवाजी बाबुलाल राव (वय ३९), त्याचा मुलगा मुकेश ऊर्फ माँटी शिवलाल राव (वय १९, दोघेही रा. उत्तमनगर, नवी दिल्ली, मूळ रा. पाली, राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता, ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. एकता ब्रिजेश भाटी असे गोळीबारात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना गोळ्या लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणेआठला एकता भाटी यांना दोघांनी गोळ्या घालून ठार केले. संबंधित आरोपी झेलम एक्‍सप्रेसने दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथके पुणे रेल्वे स्थानकात तपासणी करीत होते. त्या वेळी फ्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर पोलिस निरीक्षक गजानन पवार व पोलिस कर्मचारी मोहसिन शेख यांना आरोपी रेल्वेच्या डब्यात जाताना दिसले. पवार यांनी त्यांच्याकडे चौकशी केली, त्या वेळी शिवलालने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर शिवलाल तेथून पळाला, त्यास मालधक्का चौकात पडले. तर, मुकेशला दौंडमध्ये पकडले.

शिवलाल हा मुकेशचा वडील असून, दोघेही दोन दिवसांपूर्वी पुण्यात आले. घोरपडीत नातेवाइकाच्या घरी राहिल्यानंतर त्यांनी वडगाव शेरी येथील छत्रपती शिवाजी उद्यानातून दुचाकी चोरली. त्यानंतर बुधवारी सकाळी भाटियाचा खून केल्यानंतर दोघांनी दिवसभर सारसबागेत वेळ घालविला. गणपतीचे दर्शन घेऊन झेलम एक्‍सप्रेसने निघणार होते.

सुपारी नेमकी कोणी दिली?
एकताचा पती ब्रिजेश भाटीने दिल्लीतील एका ३७ वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यापूर्वी संबंधित महिला मार्च महिन्यात भाटी यास भेटली होती. त्यानंतर तिने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार दिल्ली पोलिसांनी भाटी यास अटक केली. दीड महिना तिहार तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. ब्रिजेश भाटी व दिल्लीतील महिलेचे चार वर्षांपासून संबंध होते. दरम्यान, एकता भाटी यांना मारण्याची सुपारी नेमकी कोणी दिली? याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com