सासवडमध्ये गुंडांकडून हवेत गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

लोणी काळभोर - पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून हडपसर परिसरातील गुंड सुजित वर्मा टोळीतील तिघांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सासवडनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडला. यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, पाठलाग करताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.   

निखिल शिवराज लोहार, किशोर दवाणे (दोघेही रा. भेकराईनगर), हनुमंत लक्ष्मण वाघमारे (रा. उरुळी देवाची) अशी आरोपींची नावे असून, यातील लोहार व वाघमारे यांना सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताब्यात घेतले. लोहार हा अट्टल गुन्हेगार असून, होळकरवाडी येथील उद्योजक कुमार झांबरे यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे.

पोलिस पथकाला २० हजारांचे बक्षीस
गोळीबाराची घटना घडल्यानंतर अवघ्या चार तासांच्या आत दोन आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर व त्यांच्या पथकाला वीस हजारांचे बक्षीस जाहीर केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing by Gund Crime