पिंपरीच्या महापौरांकडून पवनानगरमध्ये गोळीबार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

महापौर राहुल जाधव यांनी पवना धरण परिसरात पिस्तुलातून गोळीबार केल्याची पवनानगर आणि पिंपरी-चिंचवड शहरात चर्चा आहे.

पिंपरी - महापौर राहुल जाधव यांनी पवना धरण परिसरात पिस्तुलातून गोळीबार केल्याची पवनानगर आणि पिंपरी-चिंचवड शहरात चर्चा आहे. दरम्यान, मी गोळीबार केलेला नसून, पावसात भिजल्याने केवळ पिस्तूल साफ केले,’ असे महापौर जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरण शंभर टक्के भरल्याने महापौर जाधव यांनी सपत्निक जलपूजन केले. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) या वेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह काही पत्रकार व अधिकारी उपस्थित होते. 

जलपूजनानंतर सर्वजण धरणालगतच्या ठाकूरसाई परिसरातील एका हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले. भोजन झाल्यानंतर महापौर जाधव यांनी नवीन पिस्तूल काढले. मित्रांना दाखवून त्याबाबतची माहिती दिली. हास्यविनोद सुरू असताना दोनवेळा हवेत फायर केल्याने खळबळ उडाली. 

पिस्तूल साफ केले, फायर नाही : महापौर
जलपूजनाच्या कार्यक्रमामुळे मी पावसात भिजलो होतो. माझे पिस्तूल कमरेला होते. त्याचा परवाना आहे. पिस्तूलही भिजलेले होते. ते मी साफ करीत होतो. त्या वेळी काही पत्रकारांनी फोटो घेतले आणि फायरिंग केल्याचे खोटे वृत्त पसरविले. मी गोळीबार केलेला नाही. परवान्यानुसार मला ‘बुलेट राउंड’ मिळालेल्या आहेत. त्या तशाच आहेत. फायर केले असते तर ‘राउंड’ कमी राहिले असते, असे महापौर राहुल जाधव यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing in Pawanagar by Mayor of Pimpri