
Firodia Karandak : फिरोदिया करंडक ‘बीएमसीसी’कडे
पुणे : फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन गुणदर्शन स्पर्धेच्या अंतिम फेरीत बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) संघाने प्रथम पारितोषिक पटकावत करंडकावर आपले नाव कोरले. सांघिक पारितोषिकासह लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच विभागांत अव्वल क्रमांक पटकावत बीएमसीसीने यंदा स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
स्पर्धेची अंतिम फेरी पार पडल्यानंतर रविवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आला. यंदा द्वितीय क्रमांक पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या संघाने, तर तृतीय क्रमांक आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या संघाने पटकावला. निकाल जाहीर झाल्यानंतर स्पर्धकांनी नाट्यगृहाबाहेर जल्लोष केला. सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी निर्मित आणि एचसीएल फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे हे ४९ वे वर्ष होते.
स्पर्धेची अंतिम फेरी सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) तीन सत्रांमध्ये पार पडली होती. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या एकूण नऊ संघांनी अंतिम फेरीत सादरीकरण केले होते. यामध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या महाविद्यालयांसह पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय, राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांचा समावेश होता. अंतिम फेरीसाठी विनोद लवेकर, संदीप पाठक, चिन्मयी सुमित आणि मुग्धा गोडबोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सविस्तर निकाल ः
सांघिक पारितोषिके ः
प्रथम - बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे (तुम बहते रेहना)
द्वितीय - स. प. महाविद्यालय (उबरमेन्सचं)
तृतीय - डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय (सांबरी)
लेखन ः
प्रथम - हृषिकेश नाळे (बीएमसीसी)
द्वितीय - जितामित्र कुलकर्णी (स. प. महाविद्यालय)
तृतीय - आर्या डिग्रजकर, अथर्व खोत (एम. आय. टी. - वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी)
दिग्दर्शन ः
प्रथम - संकेत हंडाळ, अमेय रुद्र (बीएमसीसी)
द्वितीय - प्रचिती भावे, नील देशपांडे (स. प. महाविद्यालय)
तृतीय - सचिन डफळे, वेदांत गिडये (डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय, आकुर्डी)
अभिनय (पुरुष) ः
प्रथम - मयंक मोहीरे (बीएमसीसी)
द्वितीय - संकेत हंडाळ (बीएमसीसी)
तृतीय - नील देशपांडे (स. प. महाविद्यालय)
उत्तेजनार्थ - आशुतोष मोरे, आर्यन गायकवाड, मुकुल ढेकळे, गोविंद रेगे
अभिनय (स्त्री) ः
प्रथम - साक्षी देशपांडे (बीएमसीसी)
द्वितीय - योगिनी देशमुख (राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
तृतीय - सई कांबळे (फर्ग्युसन महाविद्यालय)
उत्तेजनार्थ - मृणाल बर्वे, पल्लवी विश्वास
सांघिक अभिनय ः श्रेयस चौधरी, विशाल झळके, ओंकार येरावार, वैष्णवी खंडागळे (जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय)
सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ ः डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय, आकुर्डी