क्वालिटी मार्क मानांकन मिळवणारी राज्यातील पहिली कात्रज डेअरी 

डी. के. वळसे पाटील
गुरुवार, 26 जुलै 2018

कात्रज डेअरी ही ISO २२०००:२००५ सटिफाईड असून कात्रज डेअरीचे तूप अॅगमार्कच्या स्पेशल ग्रेडचे आहे. तसेच राज्यशासनाचा उर्जा बचतीचा पुरस्कार पाच वर्ष संघाला मिळालेला आहे.

मंचर : पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाला (कात्रज डेअरी) क्वालिटी मार्क मानांकन मिळालेले आहे. हे मानांकन मिळवणारी राज्यातील पहिली डेअरी आहे. अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू धर्माजी हिंगे पाटील यांनी दिली.

कात्रज डेअरी ही ISO २२०००:२००५ सटिफाईड असून कात्रज डेअरीचे तूप अॅगमार्कच्या स्पेशल ग्रेडचे आहे. तसेच राज्यशासनाचा उर्जा बचतीचा पुरस्कार पाच वर्ष संघाला मिळालेला आहे. एनडीडीबी यांचेकडून देशातील शेकडो जिल्हा दुध संघाच्या स्पर्धेत राज्यात प्रथमच महिला सशक्तीकरण उत्कृष्ट कार्य पुरस्कार व इनोव्हेशन पुरस्कार संघाला मिळाला आहे. पर्यावरणासंबंधित असलेल्या ISO १४००१:२०१५ हे STANDARD  संपादन करण्यासाठी डेअरीची वाटचाल सुरु आहे. सर्व मानांकनामध्ये क्वालिटी मार्क हे डेअरीच्या मुकुटावरिल तुरा आहे.

कात्रज डेअरीचे दुध, सुगंधी दुध, स्टरलाईज फ्लेवर दुध, तूप, बटर, ICECREM, प्लेन, मँगोलस्सी, पायनापल लस्सी पेढा, मँगोबर्फी, कलाकंद, काजूकतली, अंजीरबर्फी, मलईबर्फी, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, क्रीम, पाश्चराइज्ड क्रीम इ. शंभराहून अधिक वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रोडक्टस उपलब्ध आहेत. कात्रज डेअरीचा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या निर्देशाखाली स्वतंत्र PRODUCT ब्लॉक बांधकाम करून उत्पादन वाढविण्याकडे वाटचाल आहे. पेढे व विविध प्रकारच्या बर्फी VACCUM PACKING करून त्याची टिकण्याची क्षमता ४५ दिवसांची करावयाची भविष्यात डेअरीची योजना आहे. दुध उत्पादकांच्या हितासाठी संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली डेअरी प्रगती पथावर आहे. असे हिंगे पाटील यांनी सांगितले.

पिशवीतील दुधाच्या गुणवते विषयी संभ्रम आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांनी क्वालिटी मार्क हे मानांकन जाहीर केलेले आहे. एगमार्क,  हॉलमार्क व आय एस आय मार्क हे दर्जेदार उत्पादनाचे प्रतिक मानले जाते. तसेच दर्जेदार दुध व दुग्धजन्य पदार्थांनाच क्वालिटी मार्क हे मानांकन दिले जाते.

क्वालिटी मार्क हे मानांकन मिळविण्यासाठी दुध डेअरीला राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड दुध उत्पादन, दुध संकलन, दुध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया व उत्पादन तसेच साठवणूक व विक्री या सर्व स्तरांची कडक इन्स्पेक्शन केली जाते.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The first dairy in the state of Katraj dairy who got Quality Mark Rating