'ओल्ड क्लॉथ''चा पहिला फॅशन शो पुण्यात! (व्हिडिओ)

शरयू काकडे
मंगळवार, 18 जून 2019

- जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या डिझायनर कपड्यांचा फॅशन शो पुण्यात
- फक्त पुण्यातच नव्हे तर भारतात पहिल्यांदा असा फॅशन शो 
- सर्वसामान्य महिलांनी डिझाईन केले  डिझायनर कपडे
- येत्या काही वर्षात कपड्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या भीषण होणार
- पर्यावरणपुरक जीवनशैली निर्माण आवश्यकता

पुणे : जुन्या वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना मुळात आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहे. याच संकल्पनेचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचे काम 'इकोरिगेन' ही संस्था करते. अंजनेया साठे ग्रुप आणि इकोरिगेन यांच्यातर्फे नुकताच जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या डिझायनर कपड्यांचा फॅशन शो पुण्यात झाला. हा फॅशन शो फक्त पुण्यातच नव्हे तर भारतात पहिल्यांदा झाला आहे. जुन्या कपड्यांवर काम करणारा इकोरिगेन हा भारतातील एकमेव ब्रँड आहे.

अंजनेया साठे ग्रुप आणि इकोरिगेनच्या संयुक्त विद्यमाने 'हेल्पिंग अर्थ' हा कार्यक्रम शनिवारी (ता. 15) सिंबॉयसिस विश्वभवन येथे पार पडला. या कार्यक्रमअंतर्गत जुन्या कपड्यांच्या 'फॅशन शो' आयोजित केला होता. या 'फॅशन शो'मध्ये कपडे, ज्वेलरी, शुज, जुन्या कपड्यांपासून बनविले असून संस्थेच्या 'वूमन एम्पॉवरमेंट सेंटर'मध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य महिलांनी डिझाईन केले आहेत. येत्या काही वर्षात कपड्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या भीषण होणार आहे. या समस्येवर उपाय म्हणून पर्यावरणपुरक जीवनशैली निर्माण करण्याच्या हेतुने हा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

Image may contain: 1 person, standingयावेळी आनंदवनचे कार्यकर्ता भास्कर गोखले, जीवित नदी या संस्थेसोबत कार्यरत असलेल्या शैलजा देशपांडे, मैत्री ही संस्थेच्या विनिता तटके अखंड ग्रामीण आदिवासी भागात आरोग्य संवाद साधाणारे डॉ. मोहन देस, अंजनेय साठे गृपचे अंजनेय साठे आणि इकोरिगेनचे स्वप्निल जोशी आदी उपस्थित होते. या पर्यावरणपुरक उपक्रमाचे सर्व पाहुण्यांनी कौतुक केले. तसेच समाजासाठी अवरितपणे झटणाऱ्या उपस्थित मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

Image may contain: 1 person, standing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First fashion show of old clothes in Pune