पहिली स्वदेशी हायड्रोजन बस धावली

एनसीएल आणि सेंटीयंट लॅबची कामगिरी; लवकरच रस्त्यावर
हायड्रोजन बस
हायड्रोजन बसsakal

पुणे : देशाची पहिली हायड्रोजनवर चालणारी पूर्णतः स्वदेशी बनावटीची बस पुण्यात विकसित करण्यात आली आहे. हिंजेवाडी येथील सेंटीयंट लॅबच्या कार्यशाळेत(Sentient Labs) तिचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आणि केंद्रीय विद्युत रासायनिक संशोधन संस्था सहकार्याने केपीआयटीच्या सेंटीयंट लॅबने ही बस विकसित केली आहे.

अनावरण प्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, लॅबचे अध्यक्ष रवी पंडित आदी उपस्थित होते. स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून हायड्रोजन इंधन ((hydrogen fuel) घटाकडे पाहिले जात असून, जगभरात यावर संशोधन आणि प्रयोग चालू आहे. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात सहा चाकी ३२ आसनांची बस माध्यमांसमोर चालविण्यात आली. डॉ. माशेलकर म्हणाले,‘‘मेक इन इंडिया म्हणजे परदेशातील आयात संयंत्रे भारतात आणून जोडणे नव्हे. तर इथे संशोधन करून प्रत्यक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करणे होय.

हायड्रोजन बस
देशातील OBC आरक्षण धोक्यात !: छगन भुजबळ; पाहा व्हिडिओ

भविष्यकालीन इंधनाचा मोठा स्रोत असलेल्या हायड्रोजन इंधनात भारताला मोठी प्रगती करण्याची क्षमता आहे. यासाठी उद्योग, संशोधन संस्थांबरोबरच प्रशासकीय धोरणांचा समन्वय आवश्यक आहे.’’ दूरच्या अंतरासाठी विकसित केलेली कदाचित हे जगातील पहिलेच संशोधन आहे. यासाठी लागणारे सर्वच्या सर्व संयंत्रे पुणे आणि बंगळूर येथील प्रयोगशाळांमध्ये विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर हायड्रोजन इंधनाचे नवे पर्याय आणि विद्युत घटाच्या साठवणूक संदर्भातील नवे संशोधन आम्ही लवकरच घोषित करणार आहोत, असे पंडित यांनी सांगितले.

हायड्रोजन इंधन विद्युत घट

रासायनिक ऊर्जेचे सरळ विद्युत् ऊर्जेत अखंडपणे रूपांतर करणारे साधन. यामध्ये एका विद्युत् अग्राला हायड्रोजनासारखे इंधन व दुसऱ्याला ऑक्सिजन वा हवेसारखा ऑक्सिडीकारक पदार्थ पुरविण्यात येतो. यातून इलेक्ट्रॉन-विनिमयाने विजेची निर्मिती होते.

हायड्रोजन बस
पीएमपी बस सुरू करून विद्याथ्यांची गैरसोय दूर करावी

हायड्रोजन घटाची वैशिष्ट्ये

  • कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही

  • यातून शुद्ध पाण्याचे उत्सर्जन होते

  • पेट्रोल, डिझेल आदींच्या तुलनेत दुप्पट ऊर्जानिर्मितीची क्षमता

  • हायड्रोजनच्या निर्मितीसाठी विविध पर्याय उपलब्ध

बसची वैशिष्ट्ये

  • इलेक्ट्रॉनिक्स आणि यांत्रिकी संयंत्रांची देशातच निर्मिती

  • संपूर्ण यंत्रणा बसच्या वरच्या भागात, त्यामुळे सुरक्षितता अधिक

  • सहाशे किलोमीटर धावण्याची क्षमता

  • एक किलो हायड्रोजनमध्ये २० किलोमीटर धावते

    भरपूर सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता आणि कृषिप्रधान देश असलेल्या भारतासाठी हायड्रोजन इंधन विद्युत घट हा सर्वोत्तम इंधन पर्याय आहे. यासाठी लागणारे पॉलिमर मेंम्बरेन, उत्प्रेरक आदींची निर्मिती लवकरच देशातच होणार आहे. याद्वारे या इंधन विद्युत घटाची क्षमता दुपटीने वाढविणे शक्य होणार आहे.

    - डॉ. आशिष लेले, संचालक, एनसीएल

हायड्रोजन इंधन विद्युत घटावर आधारित या बसेस लवकरच रस्त्यावर उतरविण्यासाठी आम्ही वाहन क्षेत्रातील कंपन्यांशी चर्चा करत आहो. अशा १००० बसेस जरी रस्त्यावर आल्या तरी आजच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि स्वच्छ दळणवळणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

- रवी पंडीत, अध्यक्ष, केपीआयटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com