राज्यातील पहिली ऑनलाईन ग्रामसभा कांदळीला संपन्न

दत्ता म्हसकर
मंगळवार, 1 मे 2018

जुन्नर : कांदळी (ता.जुन्नर) येथे आज मंगळवार ता. १ मे रोजी राज्यातील पहिली ऑन लाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेच्या विषय पत्रिकेतील 24 विषयांवर 250 हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सरपंच विक्रम भोर यांनी सांगितले.

ऑनलाईन ग्रामसभेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शरद सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तहसिलदार किरण काकडे, विस्तार अधिकारी जयश्री बेनके, सरपंच विक्रम भोर, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी ठोकळ  व ग्रामस्थ  उपस्थित होते.

'ज्या नागरिकांना ग्रामसभेला प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नाही त्यांना आपल्या समस्या, प्रश्न  मांडता यावेत यासाठी ऑनलाइन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते", असे भोर यांनी सांगितले.  

ग्रामपंचायतीने एक ऍप तयार केले आहे. यात ग्रामपंचायतीची सर्व माहिती देण्यात आली आहे. ग्रामसभेच्या वेळेस ज्या  ग्रामस्थास सहभाग घ्यायचा असेल त्यांनी  ऍप डाऊनलोड करुन घेतले तर प्रत्यक्ष ग्रामसभा सुरु असताना सभेत जे काही प्रश्न उपस्थित होतील ते दिसतील त्यात हो किंवा नाही अशा स्वरूपात उत्तर नोंदविता येणार आहेत. गावातील एकूण एक हजार 700 खातेदार असून आजपर्यंत 1077 जणांनी ऐप डाउनलोड करून घेतले आहे.

आमदार सोनावणे म्हणाले , 'प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात आज कांदळी गावाने एक पाऊल पुढे टाकले असून तालुक्यातील अन्य गावांनी हा आदर्श घेतला पाहिजे.' तहसीलदार काकडे म्हणाले, या एॅपमध्ये हवामान तसेच बाजारभाव याचा संदेश मिळणार असल्याने शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. गटविकास अधिकारी गाढवे म्हणाले , भविष्यात ऑन लाईन ग्रामसभेचा हा कांदळी पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविला जाईल यात शंका नाही.

Web Title: First Online Gram Sabha held in Kandali