बारा नगरसेवकांना "भाजप'चा झटका?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिल्या टप्प्यात सुमारे 12 नगरसेवकांना झटका दिल्याचे समजते. त्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून, अनेक पदाधिकारी सायंकाळी मुंबईला रवाना झाले.

भाजपच्या शंभर उमेदवारांची यादी सध्या प्रदेशकडे आली आहे. त्यातील 40 नावे आज प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, त्याबाबत वादविवाद झाल्याने ऐनवेळी यादीची प्रसिद्धी थांबविण्यात आली; तसेच शहरातील आमदारांना सायंकाळी मुंबईला बोलाविण्यात आले. यादीत 12 विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी कापण्यात आल्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. त्यात काही महिला नगरसेविकांचाही समावेश आहे.

शिवसेनेबरोबर युती झाली नसली, तरी पक्षातील शह-काटशहाचे राजकारण रंगले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: In the first phase 12 corporators flip the BJP