सातव्या मृदगंध स्पर्धेत 'सैनिकहो तुमच्यासाठी' नाटिकेस प्रथम क्रमांक

मिलिंद संगई, बारामती
रविवार, 19 ऑगस्ट 2018

बारामती : येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित सातव्या मृदगंध 2018 विविध गुणदर्शन स्पर्धेत पिंपळीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर शाळेच्या सैनिकहो तुमच्यासाठी नाटिकेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देण्यासाठी फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून मृदगंध विविध गुणदर्शन स्पर्धा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात घेतली जाते. यंदा 18 शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. 

या स्पर्धेत जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्लॅस्टिकबंदीच्या सादरीकरणास द्वितीय तर विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर व विद्या प्रतिष्ठान सीबीएसई स्कूलने सादर केलेल्या हास्यरस या सादरीकरणास विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. 

विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेस उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान केले गेले. उत्कृष्ट अभिनय पुरुष- हर्ष प्रणेता रजपूत (विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर) व आदित्य हनुमंत भोसले (विद्या प्रतिष्ठान सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल), उत्कृष्ट अभिनय महिला - आदिती किरण सोरटे (विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल), सानिका पणधीरकर ( विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर पिंपळी), उत्कृष्ठ नेपथ्य - प्रवीण टिळेकर (विद्या प्रतिष्ठान बिल्ट भिगवण शाळा), संदीप यादव (विद्या प्रतिष्ठान सीबीएसई स्कूल), उत्कृष्ट लेखन व संवाद एन बी रकटे (विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळा), उत्कृष्ठ दिग्दर्शन- कैलास हिलाले (विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर, पिंपळी).

झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छोट्या संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा दिवेश मेदगे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे सचिव द रा उंडे, विश्वस्त अॅड. नीलीमा गुजर, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली गेली. हनुमंत कुबडे व अजय तपकिरे यांनी परिक्षक म्हणून परिक्षण केले. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: first price for drama of sainikaho tumchyasathi in mrudugandha competition