पिंपरीत पहिल्या तिमाहीत २२८ कोटी रुपये कर जमा

पिंपरीत पहिल्या तिमाहीत २२८ कोटी रुपये कर जमा

पिंपरी - चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये महापालिकेच्या करसंकलन विभागाकडे मिळकत करापोटी एक लाख ९७ हजार ७४२ करदात्यांनी २२८ कोटी २३ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. मिळकतधारकांना करात सवलत मिळावी, यासाठी महापालिकेने ३० जूनपर्यंत मुदत दिली होती. लोकसभा निवडणुकांमुळे अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे नागरिकांना कराची बिले मिळण्यास विलंब झाला होता. 

जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत नागरिकांना बिले मिळत होती. त्यामुळे सवलतीची मुदत वाढवावी, अशी मागणी केली होती. एक लाख आठ हजार २२ जणांनी ऑनलाइन पद्धतीने १२५ कोटी रुपयांचा कराचा भरणा केला. मागील वर्षी २०१८-२०१९ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एक लाख ७२ हजार ७२६ मिळकतधारकांनी १८५ कोटी ६० लाख रुपयांचा करभरणा केला होता. 

चालू आर्थिक वर्षाकरिता ५८२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. थकबाकीसह मिळकतकराची रक्कम भरण्याची पहिल्या सहामाहीच्या करासाठी मुदत ३० सप्टेंबरपर्यंत, तर दुसऱ्या सहामाहीसाठीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. मुदतीत कर न भरल्यास दरमहा दोन ते दहा टक्के व्याज घेतले जाईल. 
डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक आयुक्त, करसंकलन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com