अकरावी प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी 'या' दिवशी होणार प्रसिद्ध

fy.jpg
fy.jpg

पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून विद्यार्थ्यांना आता नियमित पहिल्या प्रवेश फेरीच्या गुणवत्ता यादीची येत्या रविवारपर्यंत (ता.३०) प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांतील कनिष्ठ महाविद्यालयातील १ लाख ६ हजार ९७२ जागांसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज केलेल्या ७२ हजार ८२० विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शिक्षण विभागातर्फे प्रसिध्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कालावधी ही देण्यात आला होता. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत जवळपास सहा हजार १९० विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. तर, ६३ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द केले आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोन हजार ११७ विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदविले आहेत. यामध्ये ग्रीव्हीयन्स पाच प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून, त्याअंतर्गत तांत्रिक एक हजार १०१, गुणवत्ता यादी १२८, अतिरिक्त गुण ३६ ,प्रशासकीय ३९ आणि इतर ८१३ असे आक्षेप आहेत. त्यातील १ हजार ६१३ आक्षेपांना उत्तर देण्यात आले आहे. तर, अद्यापही ५०४ आक्षेप उत्तराविना पेंडीग आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये हे आक्षेपांना देखील उत्तर देण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार येत्या रविवारी (ता.३०) नियमित प्रवेश फेरी एक अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनमध्ये प्रवेशासाठी मिळालेले महाविद्यालय दर्शविले जाईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत मोबाईल संदेश पाठविण्यात येणार आहे. तसेच पहिल्या नियमित फेरीचे कट आॅफ संकेतस्थळावर प्रसिध्द केले होणार असून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी त्यांच्या लॉगइनमध्ये पाठवली जाईल, असे अकरावी ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com