पहिल्या फेरीत 41 हजार 961 विद्यार्थ्यांना प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 75 हजार 939 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 41 हजार 961 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश देण्यात आला. यातील सुमारे 17 हजार 189 विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या पहिल्या पसंती क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. 

पुणे - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची पहिली नियमित गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या 75 हजार 939 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 41 हजार 961 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश देण्यात आला. यातील सुमारे 17 हजार 189 विद्यार्थ्यांना त्यांनी नोंदविलेल्या पहिल्या पसंती क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील 285 महाविद्यालयांतील 663 शाखांसाठी एकूण 96 हजार 320 जागा आहेत. या जागांसाठी एकूण 75 हजार 939 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून (ता. 6) रविवार वगळता सोमवारपर्यंत (ता. 9) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रवेश घेता येईल. पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी (ता. 10) रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचा कट ऑफ संकेतस्थळावर जाहीर होईल. त्यानंतर 13 जुलैला दुसरी नियमित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी दिली. 

* पहिल्या फेरीत शाखानिहाय प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : 
शाखा : विद्यार्थ्यांची संख्या 
कला (इंग्रजी) : 1,472 
कला (मराठी) : 3,088 
वाणिज्य (इंग्रजी) : 11,938 
वाणिज्य (मराठी) : 6,001 
विज्ञान : 18,638 
एमसीव्हीसी (इंग्रजी) : 328 
एमसीव्हीसी (मराठी) : 496 

- ऑनलाइन अर्ज केलेले एकूण विद्यार्थी : 75,939 
- पहिल्या फेरीत प्रवेश निश्‍चित झालेले विद्यार्थी : 41,961 
- प्रथम पसंती क्रमांक मिळालेले विद्यार्थी : 17,189 
- प्रवेश न मिळालेले विद्यार्थी : 33,978 

* विद्यार्थी-पालकांसाठी सूचना : 
- पसंती क्रमांक एक मिळालेल्या विद्यार्थ्यांनी "स्टुडंट लॉगिन'मध्ये जाऊन "प्रोसिड' बटणावर क्‍लिक करावे, तरच विद्यार्थ्याचे नाव महाविद्यालयाच्या यादीत समाविष्ट होईल. 
- विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्‍यक कागदपत्रे देऊन ऑनलाइन अपलोड करून प्रवेश निश्‍चित करावा 
- पहिल्या पसंती क्रमांकाचे महाविद्यालय मिळाले असतानाही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज तिसऱ्या फेरीपर्यंत "ब्लॉक' केला जाईल. 
- पसंती क्रमांक दोन ते दहापैकी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनीदेखील "स्टुडंट लॉगिन'वर जाऊन "प्रोसिड' बटण क्‍लिक करावे. 
- पसंती क्रमांक दोन ते दहामधील विद्यार्थ्यांना प्रवेश मान्य नसल्यास त्यांनी दुसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी. 
- पसंती क्रमांक दोन ते दहापैकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि नंतर काही कारणास्तव तो रद्द केल्यास अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा क्रमांक "ब्लॉक' केला जाईल, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. 

शहरातील प्रमुख महाविद्यालयांचा अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील कट ऑफ : 
(खुला गट) 
* महाविद्यालयाचे नाव : "कट ऑफ'ची टक्केवारी (बेस्ट ऑफ फाइव्हनुसार) 

* विज्ञान शाखा : 
- लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय : 97.6 टक्के 
- फर्ग्युसन महाविद्यालय : अनुदानित आणि विनाअनुदानित - 96.4 टक्के 
- मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर : अनुदानित - 94.4 टक्के, विनाअनुदानित- 93.8 टक्के 
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय : 93.2 टक्के 
- स. प. महाविद्यालय : अनुदानित - 93 टक्के, विनाअनुदानित - 92 टक्के 
- नूमवि : 92.4 टक्के 

* वाणिज्य शाखा (इंग्रजी) : 
- बीएमसीसी : 95 टक्के 
- गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स : 93.4 टक्के 
- सिंबायोसिस महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता : 92.6 टक्के 
- स. प. महाविद्यालय : 91 टक्के 
- मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर : अनुदानित - 90.2 टक्के, विनाअनुदानित - 87.8 टक्के 
- नूमवि : 85.6 टक्के 

* कला शाखा : 
- फर्ग्युसन महाविद्यालय : 96.8 टक्के (इंग्रजी), 84.6 टक्के (मराठी) 
- सिंबायोसिस महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता : 95 टक्के (इंग्रजी) 
- स. प. महाविद्यालय : 94.4 टक्के (इंग्रजी), 82.2 टक्के (मराठी) 
- मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर : 93.6 टक्के (इंग्रजी), 69.4 टक्के (मराठी) 
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय : 60 टक्के (मराठी) 

Web Title: first round 41961 students are admitted