
अकरावीच्या पहिल्या फेरीसाठी ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला प्राधान्यक्रमाचा पर्याय
पुणे - इयत्ता अकरावीच्या (Eleventh) पहिल्या नियमित प्रवेश (Admission) फेरीसाठी विद्यार्थ्यांना (Student) कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम (Priority) निवडण्याच्या पर्यायाची मुदत रविवारी रात्री संपली. पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ७५ हजार ७४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर जवळपास ५८ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी २७ ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ३११ कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. याद्वारे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रवेशासाठी एक लाख ११ हजार २०५ जागा उपलब्ध झाल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या ६७ हजार १३१ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक, तर ६६ हजार २४७ विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरीफाय झाले आहेत.
हेही वाचा: "माळवा-बुंदेलखंड बाजीरावांचे ऋण विसरणार नाही"
पहिल्या नियमित प्रवेश फेरीची तात्पुरती संभाव्या गुणवत्ता यादी सोमवारी (ता.२३) जाहीर होणार आहे. ही सर्वसाधारण यादी असणार आहे. त्यानंतर येत्या शुक्रवारी (ता.२७) पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी झालेल्या नोंदणीची आकडेवारी (रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत) :
- शहर : कनिष्ठ महाविद्यालये : प्रवेश क्षमता : नोंदणी केलेले विद्यार्थी
- पुणे (पुणे आणि पिंपरी-चिंचवड) : ३११ : १,११,२०५ : ७५,७४९
- मुंबई : ८४९ : ३,२२,१५० : २,३४,८७३
- नागपूर : २१७ : ५८,७९५ : २६,१७८
- नाशिक : ६० : २५,३८० : २१,७४१
- अमरावती : ६५ : १५,८३० : १०,४६५
पुण्यातील अकरावी प्रवेशाच्या नोंदणीचा तपशील :
- नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ७५ हजार ७४९
- लॉक केलेले अर्ज : ६७ हजार १३१
- व्हेरीफाय अर्ज : ६६ हजार २४७
- पर्याय निवडलेले अर्ज : ५८ हजार ७६८
Web Title: First Round Eleventh Many Students Reported The Priority Option
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..