सामूहिक बलात्कार प्रकरणी महिलेला प्रथमच शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

पुणे : शाळेस सुट्टीत नातेवाईकांकडे राहण्यास गेलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणात महिलेसह चौघांना विशेष न्यायाधीश एस. के. कर्‍हाळे यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सामुहिक बलात्कारात न्यायालयाने सहआरोपी महिलेला सुनावलेली महाराष्ट्रातील पहिलीच शिक्षा आहे.  

मनोज सुरेश जाधव (21), वर्षा धनराज गायकवाड (32),  अजय दिपक जाधव (22 तिघेही रा.  सर्वोदय कॉलनी, आनंदनगर, मुंढवा) आणि प्रशांत गुरूनाथ गायकवाड (28, रा. रक्षकनगर, खराडी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत बारा वर्षीय पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. 13 एप्रिल 2016 ते 25 मे 2016 दरम्यान रक्षक नगर, केशवनगर, मुंढवा येथील पिंगळे वस्ती हा प्रकार घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी काम पाहिले.  सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी मेहर यांनी गुन्ह्याचा तपास केला.

Web Title: For the first time woman gets Life imprisonment in the case of gang rape