तक्रारवाडी येथील मासळी बाजाराचे भिगवण येथे स्थलांतर

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

भिगवण : तक्रारवाडी(ता.इंदापूर) येथे मागील पंधरा वर्षांपासून सुरु असलेल्या उजनी जलाशयावरील सर्वात मोठ्या मासळी बाजाराचे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवाराच्या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

नवीन ठिकाणी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यामुळे मासळीचा व्यापार आणखीच वाढण्याची शक्यता मच्छीमार व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

उजनी जलाशयातील गोड्या पाण्याच्या माशांसाठी तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथील मासळी बाजार पुणे जिल्ह्यासह राज्यामध्ये परिचित होता. तक्रारवाडी येथील गाळ्यांमध्ये हा मासळी बाजार मागील पंधरा वर्षापासुन भऱत होता. या ठिकाणी पुणे, सोलापुर, अहमदनगर, सातारा आदीं जिल्ह्यासह राज्यातील मत्स व्यापारी मासळी खरेदीसाठी येत होते तर येथील मासळी थेट पुणे, मुंबई, हावडा आदी ठिकाणापर्यंत पोचली आहे.

येथील मासळी व्यापारांमध्ये वाढ झाल्यामुळे येथील व्यवस्था काही प्रमाणात अपुरी पडत होती. तक्रारवाडी येथील मासळी बाजारांमध्ये काही प्रमाणात असुविधा व परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असल्याची तक्रारीही होत्या. 

इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राष्ट्रीय मत्स्यकी विभागाच्या आर्थिक सहकार्यातुन येथील उपबाजार आवारांमध्ये दोन वर्षापुर्वीच अद्ययावत मासळी बाजार उभारण्यात आला होता. काटेधारकांसाठीही शेड उभारण्यात आले होते. परंतु व्यावसायिक व प्रशासन यांचेमध्ये काही बाबतीत मतभेद असल्यामुळे मासळी बाजार मागील काही दिवसांपासुन उदॆघाटनाच्या प्रतिक्षेत होता. अखेर इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी पुढाकार घेत मासळी बाजार नवीन जागेमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला.

सध्या मासळी आडतदारांसाठी गाळे, काटेधारकांसाठी शेड, स्वच्छतागृह आदी सुविधा नवीन मासळी बाजारांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी होत असलेली मासळीची विक्रमी उलाढाल विचारात घेऊन मच्छी व्यापाऱ्यांना गाळे, मच्छीमारांनाही आधुनिक सुविधा उपलब्ध करुऩ देण्याची भुमिका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाकडुन घेतली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये भिगवण येथील मासळी बाजारामधील आणखी वाढण्याची शक्यता मच्छीमार व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Fish Market in Takrarwadi shifted to Bhigwan