उजनी धरणातील मासे खातात ‘भाव’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

मासळीचे भाव (कंसात सरासरी आवक)
चिलापी १३० ते १६० (६ टन), शिंगटा १०० ते २५० (१ टन), रहू २८० ते ३०० (१ क्विंटल), गुगळी ४०० ते ५०० (१ क्विंटल), मिरगळ १२० ते २०० (१ क्विंटल), सपर्निस १२० ते १६० (१ क्विंटल), कटला २५० ते २८० (१ क्विंटल), आंबळी ७० ते ९० (१ क्विंटल), खरच्या २० ते १६० (१.५ टन), मरळ ४५० ते ५०० (१५ किलो), वाम ५०० ते ६०० ( १० किलो)

भिगवण - उजनी धरणातील पाण्याचे प्रदूषण, बदललेले हवामान व यंदा धरणामध्ये असलेला विक्रमी पाणीसाठा, यामुळे उजनी धरणामध्ये मच्छीमारांना मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मासळी बाजारामधील आवक कमी झाली आहे. गारठ्यामुळे खवय्यांकडून मागणी कायम असल्यामुळे भावामध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मासळी बाजारांमध्ये उजनी धरणाबरोबरच तलावातील मासेही मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. बाजारांमध्ये विक्रीस येणाऱ्या चिलापी माशांची आवकही चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे चिलापी माशांचे भाव हे ६० रुपयांवरून थेट दुपटीपेक्षा अधिक १३० ते १६० रुपयांपर्यंत वधारले आहेत. शिंगटा, रहू, गुगळी, मिरगळ कटला, वाम, मरळ याही माशांच्या भावांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, ‘‘पुढील महिन्यात पाणीसाठा कमी झाल्यानंतर व वडाप सुरू झाल्यानंतर आवक वाढेल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fish rate increase in ujani dam