दरोडा टाकून खून केल्याप्रकरणी पाच जणांना 'मोक्का'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील सोड्डी (ता. मंगळवेढा) या गावी दरोडा टाकून दोघांचा खून केल्याप्रकरणी पाच जणांवर 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या'नुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

त्यापैकी टोळीप्रमुख छग्या ऊर्फ बप्प्या ऊर्फ छगन गंगाराम शिंदे (वय 26) आणि वैजिनाथ ऊर्फ किशोर रामा भोसले (वय 21, दोघेही रा. जामगाव शिवार, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या दोघांना मंगळवेढा पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्या दोघांना दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दिला आहे. 

सपाल्या भीमशा ऊर्फ हनुमंत शिंदे, सागर ऊर्फ सागया रुक्कम थोरात आणि छन्या भीमशा भोसले या तिघांवरही या प्रकरणात मोक्का लावण्यात आला आहे. ते तिघे फरारी आहेत. ही घटना 8 फेब्रुवारीला रात्री घडली. सोड्डी या गावात या टोळीने दरोडा टाकला. त्यात कस्तुरबा रामण्णा बिराजदार (वय 65) आणि मलकाप्पा रेवगुंडा बिराजदार (वय 65) या दोघांचा खून केला. याबाबत कस्तुरबा यांचा मुलगा सिद्धराया याने फिर्याद दिली आहे.

कस्तुरबा आजारी होत्या. त्यामुळे त्यांना शेजारच्या घरात खाटेवर झोपविले होते. त्या घरात कोणीच नव्हते. त्यामुळे फिर्यादीने बाहेरून घराला कडी लावली होती. दुसऱ्या दिवशी पाहिले असता, त्या घराचा दरवाजा उघडा होता. आत जाऊन पाहिले असता कस्तुरबा यांचा खून करून गळ्यातील 15 हजार रुपये किमतीचे सोन्याची सर लंपास करण्यात आली होती. तर त्याच गावात घडलेल्या दुसऱ्या घटनेत मलकाप्पा यांनाही मारहाण करून चोरी करण्यात आली होती. पुढे मलकाप्पा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते फिर्यादीचे चुलत काका होते.

गावात इतर पाच घरांतही चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी छग्या आणि वैजनाथ यांना मोक्का कायद्यानुसार शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी मोक्काचे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. छग्यावर आठ गुन्हे दाखल आहेत; तर वैजिनाथ याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. 

गुन्ह्यात वापरलेला एक चाकू जप्त करण्यात आला आहे. इतर हत्यारे वापरली आहेत का, तसेच तीन फरारी साथीदारांच्या शोधासाठी दोघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी ऍड. बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली.

Web Title: Five booked under mcoca at pune