इथं आढळले पाच कोरोनाग्रस्त रुग्ण...

इथं आढळले पाच कोरोनाग्रस्त रुग्ण...

लोणी काळभोर : हडपसर परिसरातील एका नामांकित कंपनीमध्ये काम करणारे चार व एका कामगाराची पत्नी असे पाचजण मंगळवारी (ता. २६) रात्री उशिरा कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. 

चार कोरोनाबाधित कामगारांपैकी एक कामगार कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीमाळ परिसरातील रहिवाशी असून, उर्वरीत तीन कामगार व एका कामगाराची पत्नी असे चार जण मांजरी बुद्रुक हद्दीतील रहिवाशी आहेत. मागील गुरुवारपासून सलग पाच दिवस पूर्व हवेलीमधील विविध गावात 
कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण मंगळवारीही कायम राहिले आहे. यामुळे पुणे शहराप्रमानेच पूर्व हवेलीत कोरोनाने हातपाय पसरल्याचे आढळून आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हडपसर परिसरातील वरील नामांकित काम करणारे मात्र पूर्व हवेलीत राहणारे सात कामगार व एका कामगाराचा सहा वर्षीय मुलगा व एका कामगाराची पत्नी असे नऊ जण मागील पाच दिवसाच्या कालावधीत कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. हडपसर परिसरातील वरील कंपनीशी 
निगडीत असणारे मांजरी बुद्रुक, आंळदी म्हातोबाची व कदमवाकवस्ती हद्दीतील तब्बल नऊ जण कोरोनाबाधित सापडल्याने, पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे. 

हडपसर परिसरातील एका नामांकित कपंनीमधील काही कामगारांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने 
कंपनी व्यवस्थापनाने गुरुवारपासून (ता. २१) कामगारांच्या कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यात रविवारी (ता. २४) आळंदी म्हातोबाची येथील एक तर मांजरी बुद्रुक हद्दीतील एक असे दोन कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. तर मागील दोन दिवसात कदमवाकवस्ती व मांजरी बुद्रुक हद्दीतील चार कामगार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण एकाचवेळी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, हडपसर परिसरातील एका नामांकित कपंनीमधील काम करणारे चार व एका कामगाराची पत्नी असे पाच जण कोरोनाबाधित असल्याचे मंगळवारी रात्री उशीरा निष्पन्न झाले आहे. वरील चारही कामगारांच्या संपर्कात आलेले नातेवाईक व घरातील सदस्य अशा सर्वांची कोरोना टेस्ट करण्यासाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. मागील पाच दिवसात तब्बल नऊ जण कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकांनी आपआपली काळजी घ्यावी.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com