दौंड शहरातील पाच अट्टल गुंड तडीपार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

दौंड (पुणे) - दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पाच गुंडांना पुणे व नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

त्यागी उर्फ त्यागराज शांताराम रणदिवे (वय २५), अर्जून रतन गायकवाड (रा. ३७), नीलेश गणेश कदम (वय २५, तिघे रा. सिध्दार्थनगर, दौंड), अशोक विजय सोनवणे (वय ३५ ), अमोल जगन्नाथ ढवळे (वय ३१, दोघे रा. भीमनगर, दौंड) या पाच जणांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. या पाच गुंडांवर धावत्या रेल्वेत लुटमार करणे, मारहाण करणे, लुटमार, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. 

त्यागराज रणदिवे हा सध्या येरवडा कारागृहात असून, अशोक सोनवणे आणि अमोल ढवळे यांना पुणे जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात आले आहे. अर्जून गायकवाड व नीलेश कदम फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.

सहायक फौजदार दिलीप भाकरे यांच्यासह पोलिस हवालदार सचिन बोराडे व बाळासाहेब चोरमले यांनी सदर तडीपारीसाठी पाठपुरावा केला होता. 

Web Title: Five criminals tadipar from daund city