वाढदिवसाच्या वायफळ खर्चाऐवजी पाचशे झाडांची लागवड

रमेश मोरे
मंगळवार, 5 जून 2018

जुनी सांगवी - जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते श्री विजय जगताप यांच्या वाढदिवसनिमित्त व्यर्थ खर्च टाळुन त्यांच्या मित्र परिवाराने घोराडेश्वर व भंडारा डोंगर येथे ५०० झाडे लावण्यात आली. वाढदिवस असा साजरा केल्याने नवीन पिढीसमोर उदाहरण ठरेल. समाजासमोर असे प्रेरणादायी उपक्रम मार्गदर्शक ठरतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

विविध जातींची देशी झाडे घोरवडेश्वर व भंडारा डोंगरावर योवेळीलावण्यात आली. केवळ झाडे न लावता सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही आम्ही घेणार असल्याचे जगताप म्हणाले. यावेळी सुभाष काटे, डॉ देवीदास शेलार, ज्ञानेश्वर खैरे, मारुती कवडे, संजय मराठे, भाऊसाहेब कानकात्रे, संतोष लहाणे, गणेश सोनवणे, बाळासाहेब करंजूले, भाऊसाहेब जाधव, सुरेश शिंदे अमित कानडे, राहुल कचरे यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी व नागरिकांनी यात सहभाग घेतला.

Web Title: Five hundred plants are planted instead of the b'day celebration expance