ज्येष्ठ नागरीकाची पाच लाख रुपयांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

पुणे : बॅंकेत जमा होणाऱ्या पेन्शनवर साडे सहा टक्के व्याज मिळवून देण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने ज्येष्ठ नागरीकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. 

याप्रकरणी सुरेश जाई (वय 62, रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बॅंकेच्या बंडगार्डन येथील मुख्य शाखेमध्ये जाई यांचे पेन्शन खाते आहे. शनिवारी दुपारी पावणे दोन वाजता ते बॅंकेमध्ये गेले होते. त्यावेळी तोंडओळखीच्या व्यक्तीने त्यांच्याशी बोलण्यास सुरवात केली.

बॅंक खात्यामधील पेन्शनवर व्याज मिळत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे पेन्शन खाते मोड बॅलन्स खात्यामध्ये बदलून घ्या, तुम्हाला बॅंक साडे सहा टक्के वाज देईल, असे आमिष संबंधीत व्यक्तीने त्यांना दाखविले. त्यानंतर जाई यांनी त्यांच्या खात्यातील पाच लाख रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम संबंधित व्यक्तीने त्यांच्या हातातून घेऊन मोड बॅलन्स खात्यात भरतो असे सांगून तेथून निघून गेला.उशीराने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर जाई यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 
 
Web Title: Five lakh rupees fraud