भीमाशंकर कारखान्याकडून विद्यालयासाठी पाच लाखांचा निधी

सुदाम बिडकर
रविवार, 2 डिसेंबर 2018

पारगाव, (पुणे) : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने भाग विकास निधीअंतर्गंत लोणी येथे माजी विदयार्थी विकास प्रबोधिनीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाच्या नुतन इमारतीच्या कामासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली.
 
लोणी येथे आयोजित कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष व भीमाशंकरचे संस्थापक /अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व जिल्हा बॅकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या उपस्थितीत भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम व उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, सरपंच ऊर्मिला धुमाळ, माजी सरपंच उध्दवराव लंके, शरद बॅकेचे संचालक अशोक आदक, प्रदिप कोचर यांच्याकडे सुपुर्द केला याप्रसंगी भीमाशंकरचे संचालक बाबासाहेब खालकर, ज्ञानेश्वर गावडे, माऊली आस्वारे, रामचंद्र ढोबळे, शांताराम हिंगे व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे उपस्थीत होते. सुत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले.

लोणी येथील भैरवनाथ सहकारी सोसायटीच्यावतीने भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाच्या इमारतीच्या कामासाठी दिड लाख रुपये मदतीचा धनादेश सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी माजी विदयार्थी विकास प्रबोधिनीकडे याच कार्यक्रमात दिला.
 
Web Title: Five lakhs for the school from Bhimashankar factory