पाच महिन्यांत रिचवली पावणेपाच कोटी लिटर दारू

In five months the richness of 5 Crore liters of liquor per day
In five months the richness of 5 Crore liters of liquor per day

पुणे : शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल चार कोटी 72 लाख लिटर देशी-विदेशी दारूची विक्री झाली आहे. दारू पिणाऱ्यांच्या संख्येत आणि खपामध्ये वेगाने वाढ होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. 

"पीनेवालों को पीने का बहाना चाहिए', असं म्हटलं जातं. कधी दु:खात, आनंदात पार्टी म्हणून, कधी काही कारण नसताना, तर व्यसन जडल्यामुळे दारू पिणाऱ्यांचे प्रमाण हे वाढतच आहे. राज्यात महिलांकडून दारूबंदीची मागणी केली जाते; परंतु दारू विक्रीतून जास्त महसूल मिळत असल्यामुळे त्या मागणीकडे फारशा गांभिर्याने पाहिले जात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गतवर्षी महामार्गालगत पाचशे मीटर अंतरापर्यंतचे परमीट रूम आणि बिअर बार बंद झाले होते; परंतु सुधारित निर्णयानंतर ते पुन्हा सुरू झाले.

जिल्ह्यात गेल्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत देशी, विदेशी दारू आणि बिअर अशी एकूण चार कोटी 72 लाख लिटर दारू मद्यप्रेमींनी रिचवली. या तुलनेत वाईन पिणाऱ्यांची संख्या तुलनेत कमी आहे; तरी जिल्ह्यात दर महिन्याला एक ते सव्वालाख लिटर वाईनची विक्री होते. 

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान मद्यविक्री (लिटरमध्ये) 

मद्य प्रकार वर्ष 2018-19 2017-18 वाढ फरक टक्‍केवारी 
देशी 1 कोटी 15 लाख 89914 86 लाख 73 हजार 415 29 लाख 16 हजार 499 33.63 
विदेशी 1 कोटी 35 लाख 5605 1 कोटी 10 लाख 51690 24 लाख 53 हजार 915 22.20 
बिअर 2 कोटी 20 लाख 99041 1 कोटी 92 लाख 11560 28 लाख 87 हजार 481 15.03 
वाईन 5 लाख 52 हजार 061 3 लाख 74 हजार 685 1 लाख 77 हजार 376 47.34 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com