esakal | बारामतीतील 69 जणांच्या तपासणीत सापडलेत एवढे कोरोनाबाधित  
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

आज 69 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 42 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून, पाच जण पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर 22 जणांच्या नमुन्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

बारामतीतील 69 जणांच्या तपासणीत सापडलेत एवढे कोरोनाबाधित  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोग्रस्तांची संख्या आज पाचवर पोहोचली. याबाबत उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दुपारी साडेचार वाजता दिलेल्या माहितीनुसार, आज 69 जणांच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 42 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असून, पाच जण पॉझिटिव्ह सापडले आहेत, तर 22 जणांच्या नमुन्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. 

बारामतीकरांनो सावधान, आता तुमच्यासमोर आहे हो मोठा धोका...  

आजच्या या पाच रुग्णांमुळे बारामतीच्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 63 वर जाऊन पोहोचली असून, रुग्णवाढीचा वेग चिंताजनक आहे. 22 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 22 जणांचे रिपोर्टस काय येतात, या कडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. हा वेग कमी करण्यासाठी उपाययोजनांची गरज बोलून दाखवली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, आज प्रशासनाने ठरवून दिल्यानुसार, दुपारी तीन वाजताच बाजारपेठ बंद झाल्यामुळे रस्ते ओस पडले. सर्वच व्यापाऱ्यांनीही प्रशासनाने दिलेली वेळ पाळण्याबाबत सहकार्य केल्याने गर्दी कमी होण्यास मदत झाली. 
 
 
Edited by : Nilesh Shende