Pune University : पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी पाच नावे अंतिम यादीत

अंतिम मुलाखतीचा टप्पा जवळ आल्याने पुढील काही दिवसातच विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळणार
Five names final list for post of Vice-Chancellor of Pune University education
Five names final list for post of Vice-Chancellor of Pune University education esakal

पुणे : तब्बल वर्षभर लांबलेल्या कुलगुरू पदाच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी १८ व १९ मे रोजी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातील पाच उमेदवारांची नावे अतिम मुलाखतीसाठी निश्चित करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजत आहेत. अधिकृत रित्या याची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

अंतिम मुलाखतीचा टप्पा जवळ आल्याने पुढील काही दिवसातच विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळणार आहेत. त्यातही विद्यापीठातील विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापकाची किंवा विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम करत असलेल्या व्यक्तीची कुलगुरू पदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Five names final list for post of Vice-Chancellor of Pune University education
Pune News : लिंग गुणोत्तरात पुणे जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायती ‘रेड झोन’मध्ये

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी २७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर काम करत असलेल्या ११ उमेदवारांनी कुलगुरू पदासाठी अर्ज केला होता.या उमेदवारांमध्ये कुलगुरू पदासाठी चुरस होती. त्यातील चार उमेदवारांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली आहे.तर एक उमेदवार विद्यापीठाबाहेरील आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर , विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील डॉ.संजय ढोले, पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. सुरेश गोसावी आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची नावे शॉर्ट लिस्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे यातील एकाची कुलगुरूपदी निवड होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Five names final list for post of Vice-Chancellor of Pune University education
Pune Loksabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी १२ हजार ६०० मशिन उपलब्ध

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली आहे. डॉ. सोनवणे यांनी शुक्रवारी (दि.१९) पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सुध्दा मुलाखत दिली आहे. मात्र तत्पूर्वीच सोनवणे यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com