फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक; वाहनधारकांसाठी ११ जानेवारीपासून सवलत योजना

फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक; वाहनधारकांसाठी ११ जानेवारीपासून सवलत योजना

पुणे - फास्टॅग प्रणालीचा वाहनधारकांनी अधिकाधिक वापर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) पथकर नाक्‍यांवर (टोल) ११ जानेवारीपासून फास्टॅगधारक वाहनांना पाच टक्के परतावा (कॅशबॅक) देण्यात येणार आहे. 

पथकर नाक्‍यावरून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि वेगवान होण्यासाठी फास्टॅग प्रणाली विकसित केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्या प्रत्येक फेरीला पथकराच्या पाच टक्के कॅशबॅक वाहनधारकाच्या फास्टॅग बॅंक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. 

फास्टॅगचा वापर वाढावा, या हेतूने महामंडळाने कार, जीप आणि एसयूव्ही वाहनधारकांसाठी मर्यादित कालावधीसाठी ही सवलत योजना सुरू केल्याची माहिती सह-व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने पथकर नाक्‍यांवर पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. 

याअंतर्गत यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबई एन्ट्री पॉईंटतर्गंत वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहाद्दूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्‍यावर फास्टॅग प्रणाली कार्यान्वित झाली आहे. फास्टॅग प्रणालीच्या पूर्ण अंमलबजावणीच्या दृष्टीने महामंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 

या ठिकाणी फास्टॅग स्टॉल सुरू
फास्टॅगधारक वाहनांच्या संख्येत वाढ होण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतू पथकर नाका आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर, तळेगाव पथकर नाका, फूड मॉल, पेट्रोल पंपावर बॅंकांच्या मदतीने फास्टॅग स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com