वारजे येथे पाच ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

गुरुवार दि. 28जून 2018 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत खालील ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र येथे आणून द्याव्यात. 

वारजे माळवाडी - वारजे माळवाडी परिसरात प्लॅस्टिक पिशव्या देण्याची शेवटची संधी गुरुवारी 28 जून ला असून या दिवशी या परिसरात पाच ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या संकलन केंद्रात आणून द्याव्यात. असे आवाहन नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी केले आहे.

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी केली आहे. नागरिक प्लॅस्टिक पिशवी वापरताना दिसल्यास पाच हजार रुपये दंड होणार आहे. तरी या निर्णयामुळे अजूनही ज्यांच्या घरी प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल पत्रावळ्या प्लॅस्टिकचे ग्लास, चमचे किंवा बंदी घालण्यात वस्तू असतील तर त्या नष्ट करण्यासाठी एक शेवटची सुवर्णसंधी प्राप्त करून देत आहोत की गुरुवार दि. 28जून 2018 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत खालील ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र येथे आणून द्याव्यात. 

कै. गंगाबाई धुमाळ बालोद्यान व विरंगुळा केंद्र, नादब्रह्म सोसायटी शेजारील मैदान, व्हायला सोसायटी चौक हायवे, सोबापुरम सोसायटी चौक हायवे, साईसयाजी नगर चौक हायवे, या पाच केंद्रात प्लॅस्टिक जमा करावे. 

"प्लॅस्टिक ही गरजेची वस्तू नाही. आम्ही आरोग्य विभागाला मदत करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. जमा झालेले हे प्लॅस्टिक महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे दिले जाणार असून त्यांच्या वतीने त्याची योग्य विल्हेवाट लावली जाणार आहे." असे नगरसेविका दीपाली धुमाळ यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: five plastic collection centre at varje malvadi pune