CoronaVirus : पुण्यावर राजधानीचे लक्ष ; केंद्रीय पथकाच्या 'या' पंचसूत्रींंची होणार अंंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केंद्रीय पथक 25 एप्रिल रोजी दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने  विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका येथे भेट देवून पाहणी केली.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी, नागरिकांचे तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी, संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर आणि प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी या पंचसूत्रीची अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय केंद्रीय पथक 25 एप्रिल रोजी दाखल झाले आहे. या केंद्रीय पथकाने  विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका येथे भेट देवून पाहणी केली. आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक झाली. या वेळी त्यांनी कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि भविष्यात करावयाचे नियोजन याचा आढावा घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, सचिन बारवकर तसेच संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, डॉ. अंशु गुप्ता, प्रा. डॉ. सागर बोरकर आदी या वेळी उपस्थित होते.

अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले म्हणाले...

- पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना समाधानकारक
- बारामती पॅटर्नच्या माध्यमातून चांगले काम सुरू 
- झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे
.
ब्रिटिश काळातही पुण्यातल्या पेठा रिकाम्या केल्या होत्या; वाचा इंटरेस्टिंग इतिहास    

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले...
 जिल्हा प्रशासनाकडून साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू
- कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील सर्व रुग्णालये सक्षम करण्यात येत आहेत.
- विविध पथके निर्माण करून त्यांच्यावर जबाबदारी 
- सर्वेक्षण आणि चाचण्या करण्यावर भर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The five point plan of the central squad to stop the corona in pune