भिगवण येथील रेल्वेवरील दरोड्याप्रकरणी पाच दरोडेखोरांना अटक

daund
daund

दौंड (पुणे) : भिगवण रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस वर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली. रेल्वे सिग्नलची तार कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाड्यांवर ही टोळी दरोडे टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशसिंग गौड यांनी आज (ता. २१) या बाबत माहिती दिली. दौंड - सोलापूर लोहमार्गावर ८ नोव्हेंबर रोजी भिगवण (ता. इंदापूर) रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस थांबली असता दरोडेखोरांनी खिडकीतून हात घालून ललितादेवी जैन (रा. सुरत) यांच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे साठ हजार रूपयांचे मंगळसूत्र चोरले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या शोधार्थ पुणे लोहमार्ग पोलिस दलाचे अधीक्षक दीपक साकोरे, अपर अधीक्षक तुषार पाटील, उप अधीक्षक नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड लोहमार्ग पोलिस, पुणे लोहमार्ग पोलिस, नगर लोहमार्ग पोलिस, दौंड रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्तपणे भगतवाडी येथील वस्तीला वेढा घातला. त्यामध्ये कापर्या कोंगर्या भोसले (वय ५५), सोन्या संजू काळे (वय २०), संदेश मच्छिंद्र काळे (वय २०) व कबुतर्या उर्फ सुजित राजू काळे (वय २०, सर्व रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) या चौघांना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींवर पुणे, नगर व सोलापूर ग्रामीण पोलिस हद्दीत विविध गुन्हे दाखल आहेत. अटकेतील आरोपींना २६ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे दीपक बाळेकुंद्री, अनिल टेके, चंद्रकांत गायकवाड, साळवे, संजय पाचपुते, आनंद वाघमारे, श्रध्दा पठारे, संतोष कांबळे, सरफराज खान, सुनील गोयकर, आदींनी या मोहिमेत भाग घेतला. या दरोड्यात संशयित आरोपी झेलम सिकंदर्या काळे, खाज्या राजेंद्र काळे, लंगड्या सिकंदर्या काळे, नीलेश नवनाथ पवार व बई उर्फ लक्ष्मी बाक्या काळे हे या प्रकरणी फरार आहेत. 

रेल्वे सिग्नलच्या तारा कापणारी टोळी
दरोडेखोरांनी भिगवण जवळ रेल्वे सिग्नलच्या तारा कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाडीला लक्ष्य केले. लोहमार्गाखालील खडी व गाडीची खिडकी यामध्ये अंतर असल्याने एक दरोडेखोर दुसऱ्याच्या खांद्यावर बसून खिडक्यांमधील प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओढून काढले होते. या गुन्ह्यात जांबिया, कटर, सुरी, शॅाकप्रूफ पक्कड, कुर्हाडींचा वापर केल्याची माहिती सुरेशसिंग गौड यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com