पाच चोरट्यांकडून चोरीच्या 20 दुचाकी हस्तगत

संदीप घिसे 
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख 55 हजारांच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या. रामेश्‍वर विलास खंदारे (वय 25, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी), अनिल तबा काळे (वय 21, रा. भोसरमाळ, कन्हेर, पो. पोखरी ता. पारनेर, जि. अहमदनगर), अविनाश वामन मध्ये (वय 19, रा. म्हसोबाझाप, पो. पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), ओंकार रमेश चव्हाण (वय 19, रा. भोसलेनगर, गोशाळेशेजारी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे), रामेश्‍वर परमेश्‍वर भिसे (वय 21, रा.

पिंपरी (पुणे) : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख 55 हजारांच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या. रामेश्‍वर विलास खंदारे (वय 25, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी), अनिल तबा काळे (वय 21, रा. भोसरमाळ, कन्हेर, पो. पोखरी ता. पारनेर, जि. अहमदनगर), अविनाश वामन मध्ये (वय 19, रा. म्हसोबाझाप, पो. पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), ओंकार रमेश चव्हाण (वय 19, रा. भोसलेनगर, गोशाळेशेजारी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे), रामेश्‍वर परमेश्‍वर भिसे (वय 21, रा. मरकळ, राजगुरुनगर बॅंकेच्या मागे, आळंदी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहायक आयुक्‍त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खंदारे याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी काळे आणि मधे यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी चव्हाण आणि भिसे या दोघांकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या 20 दुचाकींपैकी 12 दुचाकींचे मालक शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तर उर्वरित आठ दुचाकींच्या मालकाचा शोध घेणे सुरू आहे. 

हँडल लॉक तोडून आरोपी दुचाकींची चोरी करीत असे. चोरलेल्या दुचाकींची कागदपत्रे नंतर देतो असे सांगत त्यांची विक्री ग्रामीण भागात अल्प किमतीत करीत असे. आरोपींनी आत्तापर्यंत भोसरी, दिघी, विश्रांतवाडी, पारनेर, जुन्नर, आळेफाटा, शिरूर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकींची चोरी केली आहे. वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, काळुराम लांडगे, विवेक श्रीसुंदर, गणेश हिंगे, समीर रासकर, प्रवीण पाटील, गणेश सावंत, सुधीर डोळस, नितीन खेसे, संतोष महाडीक, बाळासाहेब विधाते, सागर भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

Web Title: Five robbers get 20 two wheeler robbery