पाच रुपयांसाठी तरुणास जीवे मारण्याचा प्रयत्न 

संदीप घिसे 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पिंपरी (पुणे) - अवघ्या पाच रुपयांसाठी एका तरुणावर धारदार शस्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी रात्री हिंजवडी येथे घडली.

चैतन्य भगवान डुकरे (वय २२, रा. मुक्ताईनगर, मारुंजी रोड, हिंजवडी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश साखरे व खुशबू पान शॉपवरील मुलगा (नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

सहाय्यक निरीक्षक बलभीम ननवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी व आरोपी यांच्यात पाच रुपयांवरुन भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून चैतन्य त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: for five rupees two men tried to kill one