दुबई मॅथेमॅटिक्स चॅम्पियनशिपसाठी हडपसरच्या ५ जणांची निवड 

संदीप जगदाळे
सोमवार, 7 मे 2018

हडपसर- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दुबई मेंटल मॅथेमॅटिक्स चॅम्पियनशिपसाठी पुण्यातून ७ जणांची निवड झाली आहे यापैकी ५ जण हडपसरचे आहेत. जगभरातील २८ देशांचे स्पर्धक यामध्ये सहभागी होत असून, भारतातर्फे ७२ जणांचा संघ सहभागी होत आहे. येत्या १२ मे रोजी दुबई येथे ही स्पर्धा होणार आहे. 

हडपसर- प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दुबई मेंटल मॅथेमॅटिक्स चॅम्पियनशिपसाठी पुण्यातून ७ जणांची निवड झाली आहे यापैकी ५ जण हडपसरचे आहेत. जगभरातील २८ देशांचे स्पर्धक यामध्ये सहभागी होत असून, भारतातर्फे ७२ जणांचा संघ सहभागी होत आहे. येत्या १२ मे रोजी दुबई येथे ही स्पर्धा होणार आहे. 

हडपसरमधील मेघ काशिळकर (१४ वर्षे) बिशप्स स्कूल उंड्री, सायुज्यता चेतन तुपे (१४ वर्षे) पिअरसन स्कूल अमनोरा, आदित्य पाठक (९ वर्षे) लेक्सिकन स्कूल, निसर्ग घुले (१२ वर्षे) पिअरसन स्कूल अमनोरा, रिया बावगे (१३ वर्षे) दिल्ली पब्लिक स्कूल या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना हडपसरमधील जिनीअस किड्सचे आनंद महाजन व मोनिता महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या ५ जणांसोबत पुण्यातून स्वरित वर्मा (१० वर्षे) ब्लू रिज स्कूल हिंजवडी, राकेश गुप्ता (१० वर्षे) विक्टोरियस किड्स खराडी हे दोन स्पर्धक ही सहभागी होत आहेत. 

ही स्पर्धा तीन प्रकारात होत असून, दोन प्रकार हे क्लिष्ट गणिती प्रक्रियांवर आधारित आहे. एक प्रकार स्मरणशक्तीशी संबंधित आहे. ५०० वर्षांच्या कॅलेंडरवर आधारित ही स्पर्धा असून, भारतापुढे दुबईचे आव्हान आहे. 

कोणत्याही प्रकारची वही, पेन यांची मदत न घेता केवळ मनातल्या मनांत आकडेमोड करून सेकंदात उत्तर देण्याचे अवघड कसब या विद्यार्थ्यांनी मिळविले आहे. यासर्वांना जिनीअस किड्सचे नोरोन्हा यांचे मार्गदर्शन असून, त्यांनी आतापर्यंत ९ वेळा जागतिक विजेतेपद मिळविले आहे. 

हडसरमधून प्रथमच एवढ्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, गेले तीन महिने दररोज १० तास विद्यार्थी तयारी करत आहेत. हे नक्कीच भारतासाठी विजेतेपद मिळवतील असा विश्वास पालक सोनल तुपे यांनी व्यक्त केला. 

Web Title: five selected for the Dubai Mathematics championship