Loksabha 2019 : पाच दुय्यम निबंधक कार्यालये उद्या, पर्वा बंद राहणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे, ता. 10 : दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमले आहे. त्यांचे प्रशिक्षण गुरुवारी (ता. 11) व शुक्रवारी (ता.1 2) आहे. त्यामुळे या दोन दिवशी शहरातील सुमारे पाच दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहणार आहेत, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी दिली.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उर्वरित कार्यालये सुरू राहणार आहेत. तेथे नागरिकांना दस्त नोंदणी करता येणार आहे, असेही सांगण्यात आले. मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष या पदांकरिता नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांची निवडणूक कामकाजासाठीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 11 ते 13 एप्रिल दरम्यान आहे. त्यामुळे शहरातील काही कार्यालये या दोन दिवशी बंद राहणार आहेत.

दुय्यम निबंधक यांचे प्रशिक्षणाच्या दिवशी उपलब्ध कर्मचाऱ्यांनुसार दुय्यम निबंधक पदाचा तात्पुरता कार्यभार सोपविला आहे. तथापि, अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे काही दुय्यम निबंधक कार्यालये प्रशिक्षणाच्या दिवशी बंद ठेवावी लागणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक यांच्याकडून कळविण्यात आले आहे. 

Web Title: Five Sub-Registrar Offices will be closed tomorrow & Day After tomorrow