चालकाचा अंदाज चुकल्यानं बंधाऱ्यावरून घसरली कार; पाहा पुढे काय घडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

इंदोरी : कुंडमळ्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जाताना चालकाला अंदाज न आल्याने कार जलाशयात कोसळता कोसळता बचावली. दरम्यान, कारमधील पाच प्रवाशांचे प्राण वाचले.
मध्य रात्री उठून मेकअप करायला लावायचे अन्... 

इंदोरी : कुंडमळ्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जाताना चालकाला अंदाज न आल्याने कार जलाशयात कोसळता कोसळता बचावली. दरम्यान, कारमधील पाच प्रवाशांचे प्राण वाचले.
मध्य रात्री उठून मेकअप करायला लावायचे अन्... 

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती अशी, बारामतीच्या काटेवाडीतील श्रीकांत पवार हे चाकणहून तळेगावला चालले होते. मात्र, त्याचा रस्ता चुकल्याने ते कुंडमळा मार्गे आले. तेथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. त्यावरून पाणी वाहत आहे. परिसरातील नागरिक तेथून ये-जा करतात. त्यांना बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज आहे. मात्र, रस्ता चुकलेल्या पवार यांनी तेथील बंधाऱ्यावरून कार घातली. बंधाऱ्याच्या अर्ध्यात आल्यानंतर त्यांचे नियंत्रण सुटले व कार जलाशयाच्या बाजूला घसरली.  पण, ती जलाशयात कोसळता कोसळता वाचली.

खाते वाटप हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार : जयंत पाटील 

कारमध्ये पवार यांच्यासमवेत आणखी चार जण होते. त्यात तीन महिला होत्या. कुंडमळ्यावरील विनायक भेगडे, सागर भेगडे, संदीप पवार, मनोहर भेगडे तसेच कुंडदेवी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी धाव घेतली व कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले अन् मोठा अपघात टळला.

हिंजवडी : टीसीएस कंपनीच्या आवारातच इंजिनिअरने केली आत्महत्या

अंधार पडल्याने कार बाहेर काढणे शक्‍य नसल्याने विनायक भेगडे यांनी पवार कुटुंबीयांना घरी मुक्कामी ठेवून घेतले. बुधवारी सकाळी क्रेन आणून कार बाहेर काढली.

 बापरे! रिक्षा चक्क उलट्या दिशेने धावली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Survived at Kundala dam Incident