पार्किंगमधील ५ दुचाक्या जाळल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे - भावाला मारहाण केल्याच्या रागातून दोघांनी एका इमारतीच्या पार्किंगमधील पाच दुचाकी पेटवून दिल्या. ही घटना कसबा पेठेतील मुजुमदार गल्लीमध्ये बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

याप्रकरणी मंदार कराडे (वय २२, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जय ऊर्फ राजेश भोसले (वय २५, रा. मुजुमदार बोळ, कसबा पेठ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले याच्या भावाला तेथील एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी शनिवारवाड्याजवळ मारहाण केली होती. या गुन्ह्यात त्या आरोपीला अटकही झाली आहे; परंतु या भांडणातून भोसले याने सिद्धिविनायक इमारतीच्या पार्किंगमधील एका दुचाकीला आग लावली. त्या वेळी बाजूच्या इतर चार दुचाकीही जळून खाक झाल्या. यामध्ये एक लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करत आहेत.

Web Title: five vehicles in the parking lot were burnt in pune

टॅग्स